आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घडामोड; कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा होणार?

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भातील पुढील प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार असून, लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.
आयोगाकडून कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांच्या संघटनांकडून वेतन, भत्ते, पेन्शन तसेच कामाच्या अटींमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना मागविण्यात आल्या होत्या. यासाठी मेमोरँडम सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून 2026 पर्यंत देण्यात आली होती. आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी आपले प्रस्ताव निश्चित वेळेत सादर केले आहेत.
गेल्या काही महिन्यांत काही संघटनांनी तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन पद्धतीने मेमोरँडम सादर करण्यात अडथळे येत असल्याची तक्रार केली होती. मात्र आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून आयोग पुढील टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, आयोगाच्या आगामी बैठकींचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. 22 आणि 23 जून रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर 6 आणि 7 जुलै रोजी ओडिशातील भुवनेश्वर परिसरात, तर 9 आणि 10 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
या बैठकींमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा, संभाव्य वेतनवाढ, विविध भत्ते, पेन्शन आणि कामकाजाच्या परिस्थितीबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन व भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आयोगाच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…