नागपुरात विवाहितेचे लैंगिक व आर्थिक शोषण; धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप, दोघांना अटक

नागपूर : शहरातील सोनेगाव परिसरात एका विवाहित महिलेचे गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा, तसेच तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एका मौलवीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्याज ताज मदारे (वय 26, रा. कलमेश्वर) हा पीडित महिलेचा वर्गमित्र आहे. महिलेच्या पतीची वायुसेनेत नोकरी असल्याने ते बाहेरगावी असतात. याचदरम्यान अय्याजने प्लॉट खरेदीच्या बहाण्याने महिलेशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये ओळख वाढली.
तक्रारीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अय्याजने महिलेला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने महिलेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. 31 मे रोजी तिला कळमेश्वर येथे नेऊन अन्य दोन जणांशी भेट घडवून आणली. तेथे काही धार्मिक विधी करून तिचे धर्मपरिवर्तन झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने अखेर घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अय्याज मदारे आणि आमीन शेख यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर प्रकरणातील फरार मौलवीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासादरम्यान, आरोपीने पीडित महिलेला ब्लॅकमेल करून सुमारे 3 लाख 9 हजार रुपये उकळल्याची बाबही समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Posts

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण खर्च उचलणार

पुणे : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्या परदेशी शिष्यवृत्ती…

बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारकडून MESMA लागू

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील सार्वजनिक बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक…