लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता लवकरच खात्यात? १२ ते १५ जूनदरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता

मूंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान जमा केला जाऊ शकतो.
या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून एकूण ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला हा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय १० जून रोजी जारी केला आहे.यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता निधी मंजूर झाल्याने लवकरच रक्कम खात्यात जमा होण्याची अपेक्षा वाढली आहे.
दरम्यान, योजनेच्या नियमांनुसार अपात्र महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. फक्त पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातच ही रक्कम जमा केली जाणार आहे.
आता सर्वांचे लक्ष शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे, कारण हप्ता नेमका कधी जमा होतो याबाबत अंतिम तारीख लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Posts

टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…