‘गारंबीचा बापू’ची दमदार पुनरागमनाची तयारी; नव्या रूपात झळकणार रुपेरी पडद्यावर

मुंबई : मराठी रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेले आणि साहित्यविश्वात विशेष स्थान मिळवलेले ‘गारंबीचा बापू’ हे अजरामर नाटक आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरद्वारे करण्यात आली असून, त्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. पेंडसे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाजलेल्या कथेला आधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य सिनेमॅटिक मांडणीची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही ही कथा नव्या स्वरूपात अनुभवता येणार आहे.
‘गारंबीचा बापू – गोष्ट एका वाघाची’ असे या चित्रपटाचे नाव असून, पोस्टरमध्ये धगधगत्या आगीसमोर उभ्या असलेल्या एका बलदंड व्यक्तीची पाठमोरी आकृती पाहायला मिळते. पोस्टरमधील रहस्यमयता आणि संघर्षाची झलक पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरुप्रसाद इनामदार यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘निर्णय’, ‘हिरकणी’ आणि ‘योद्धा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी शशी पेंडसे यांनी सांभाळली आहे.
नाटक आणि साहित्यप्रेमींमध्ये ‘गारंबीचा बापू’च्या नव्या सिनेमाविषयी आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. या क्लासिक कथेचे आधुनिक रूप प्रेक्षकांना कितपत भावते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…