हंताव्हायरसचा समुद्रात थरार! क्रूझवरील 17 अमेरिकी प्रवाशांना तातडीने करणार क्वारंटाइन

करोना व्हायरसच्या भीषण आठवणी अजूनही ताज्या असतानाच, मे महिन्याच्या सुरुवातीलाच नव्या घातक हंताव्हायरसने डोके वर काढले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव अटलांटिक महासागरामार्गे युरोपच्या दिशेने जाणाऱ्या एमव्ही होंडियस नावाच्या क्रूझ जाहाजावर आढळून आला असून, जहाजावरील अमेरिकन प्रवाशांना अमेरिकेत पोहोचताच नेब्रास्का येथे क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील प्रवाशांना ओमाहा येथील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटर कॅम्प्समध्ये असलेल्या नॅशनल क्वारंटइन युनिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. जे एक अत्यंत सुरक्षित केंद्र असून, तिथे प्रवाशांच्या प्रकृतीचे निरिक्षण केले जाणार आहे, अशी माहिती युनिटचे वैद्यकीय संचालक मायकल वडमन यांनी दिली. विशेष म्हणजे, नेब्रास्कातील हे केंद्र इबोलासारख्या घातक आजारांच्या नियंत्रणासाठी जगभरात प्रसिद्ध असून, तिथे अत्याधुनिक बायोकंटेन्मेंट सुविधा उपलब्ध आहेत.
दरम्यान, एमव्ही होंडियस क्रूझ शिपवर एकूण 17 अमेरिकन नागरिक असून, त्यांना मायदेशी परतवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय विमानाची विशेष व्यवस्था करत असल्याची माहिती आहे. तसेच या जहाजावरून आधीच उतरलेले किमान सात अमेरिकन नागरिक सध्या पाच राज्यांमध्ये त्यांच्या घरी क्वारंटाइनमध्ये आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे, सुदैवाने त्यांच्यामध्ये अद्याप या व्हायरसची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाही. तसेच सद्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सीडीसीने त्यांचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर्स सक्रिय केले असून, या व्हायरसला त्यांनी तिसऱ्या स्तरावर ठेवले आहे. हा आणीबाणीच्या इशाऱ्यामधील सर्वात खालचा स्तर असला तरी, सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही कसर सोडलेली नाही. दुसरीकडे, स्पेनमधील आरोग्य कर्मचारी त्या महिलेच्या प्रकृतीचा बारीक तपास करत आहेत, जी विमानाने त्याच डच व्यक्तिबरोबर प्रवास करत होती, ज्याचा या व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाला. तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, अद्याप कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. पण तरीही नवीन राष्ट्रीय देखरेख नियमांनुसार तिची तपासणी सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…