ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली

पुणे: सहसा शनिवार-रविवार (वीकेंड) दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, १ मे पासून मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला झाल्यामुळे ही कोंडी आता जवळपास संपुष्टात आली आहे. या नवीन प्रकल्पामुळे प्रवाशांना बोरघाटातील वळणदार आणि चढ-उताराचा रस्ता टाळता येत आहे. खालापूर टोलनाका ओलांडल्यावर किंवा लोणावळ्यावरून पुण्याकडे येताना या मिसिंग लिंकला थेट कनेक्ट होता येते. मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून अतिशय सुसाट वेगाने प्रवास करणे शक्य झाले आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीची धास्ती आता प्रवाशांच्या मनातून निघून गेली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि वाहतूक कोंडी हे समीकरण मिसिंग लिंकने जवळपास पुसून काढलंय. आज शनिवार आहे आणि बोरघाटातून सुसाट वेगाने वाहतूक सुरु असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मिसिंग लिंकमुळं बोरघाटातील प्रवास टाळता येतोय, परिणामी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.पुणे-मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेण्या सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललं आहे. 180 फुटी नयनरम्य पुलावर तात्पुरते बॅरिगेटिंग करण्यात आलं आहे. त्यामुळं आता इथं वाहनं थांबणं बंद झालं आहे. 1 मे ला हा मिसिंग लिंक खुला झाला. त्यानंतर 8 मे पर्यंत 204 वाहनांवर कारवाई करत एक लाख साठ हजारांचा दंड ही वसूल करण्यात आला. मात्र तरी ही प्रवाश्यांकडून जीवघेणे प्रकार सुरु होते, हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तात्पुरते बॅरेगेटिंग केलं आहे.सहसा शनिवार-रविवार (वीकेंड) दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि कोंडी पाहायला मिळते. मात्र, १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुला झाल्यामुळे या महामार्ग मोकळा दिसत आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांना बोरघाटातील वळणदार आणि अवघड रस्ता टाळता येत आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना खालापूर टोलनाका झाल्यावर आणि पुण्याकडून मुंबईकडे जाताना लोणावळ्यावरून या मिसिंग लिंकला थेट कनेक्ट होता येते. मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचत असून सुसाट वेगाने प्रवास करणे शक्य झाले आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी आता संपली आहे. बोरघाटात जिथे आता मुख्यत्वे अवजड वाहनेच दिसत आहेत. बहुतेक लहान वाहनांनी मिसिंग लिंकचा पर्याय निवडल्यामुळे जुन्या बोरघाटातील गर्दी कमी झाली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर झाला असून एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचे समीकरण आता बदलले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…