सोलापूरसह पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; तिहेरी हत्या आणि अल्पवयीनांवरील अत्याचाराने राज्य हादरलं

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. गायत्री सुधाकर मस्के (40), मुलगी प्रिया मस्के (18) आणि मुलगा शिवराज मस्के (16) अशी मृतांची नावे असून मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गायत्री आणि प्रिया यांचे मृतदेह घराच्या गच्चीवर तर शिवराजचा मृतदेह बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातही सलग दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, तर चाकण परिसरात तीन वर्षांच्या मुलावर अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिहारमधील 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या सलग घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…