मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक आजपासून सुरु झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले


