परभणीत ३७ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; दिवसभर उन्हात फिरणे ठरले जीवघेणे

नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असलेले ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा परभणीत उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. मूळ परभणीचे असलेले कांबळे हे नाशिकमधील पिंगळे मळा येथे राहत होते. २३ एप्रिल रोजी ते आपल्या भावाकडे आले होते, तर २४ एप्रिलला कुटुंबासह साडूंच्या घरी भेट देण्यासाठी परभणीत गेले होते.
दरम्यान, दिवसभर कडक उन्हात फिरल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. शोधाशोध केल्यानंतर ते एका खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत आढळले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या भावाने नानल पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार उष्माघातामुळेच हा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या परभणीत तापमान ४२ अंशांच्या वर गेले असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. प्रशासनाने नागरिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असल्यास योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…