अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, काळ्या कारनाम्यांचं घबाड समोर आलं

नाशिक. दैवी चमत्काराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीसमोर एका चार्टर्ड अकाउंटंटने (सीए) दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जुलै 2017 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत खरातने भीती आणि अंधश्रद्धेचा आधार घेत विविध लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून “अवतार पूजा”, “गंडांतर योग” आणि इतर धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. संबंधित सीएने सांगितले की, खरातने स्वतःला दैवी शक्ती लाभलेला सिद्ध पुरुष म्हणून भासवले आणि अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र व धार्मिक अनुष्ठानांच्या आधारे लोकांचा विश्वास संपादन केला. अगदी हातचलाखीने “प्रसाद” निर्माण करून दाखवणे किंवा भविष्यवाणी खरी ठरल्याचा आभास निर्माण करून त्याने लोकांना आपल्या जाळ्यात ओढले.
सीएने आपल्या जबाबात नमूद केले की, अशोक खरातच्या सांगण्यावरून त्याने विविध पूजांसाठी कोट्यवधी रुपये दिले. मीरगाव, वावी येथील अशापीर बाबा दर्गा आणि तिरुवंतपुरम येथील समुद्रकिनारी झालेल्या कथित पूजांसाठी त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. प्रत्येकवेळी आई-वडिलांच्या जीविताचा धोका दाखवून त्याच्याकडून पैसे घेतले गेले. संशय आल्यावर या सीएने खरातच्या फार्महाऊसवर कुक म्हणून आपला माणूस पाठवून माहिती मिळवली. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, फार्महाऊसवर महिलांना आणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून अश्लील कृत्ये केली जात होती. तसेच, दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचेही उघड झाले. नकली साप आणि जादूच्या माध्यमातून लोकांना घाबरवून फसवणूक केल्याचेही समोर आले आहे.
या सर्व प्रकारातून अशोक खरातने केवळ या सीएकडूनच सुमारे 8 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप आहे. तसेच, इतर अनेक व्यक्तींनाही अशाच प्रकारे लुबाडण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. अखेर या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करत संबंधित सीएने एसआयटीकडे सविस्तर माहिती दिली असून, या प्रकरणाची चौकशी अधिक वेगाने सुरू आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…