NDPS आरोपीच्या पुनर्वसनासाठी लकडगंज पोलिसांचा पुढाकार!

गुन्हेगारीसोबत व्यसनावरही प्रहार; आरोपीची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी!

नागपुर. गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच व्यसनाधीन तरुणांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अभिनव उपक्रम राबविला आहे. NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील २६ वर्षीय आरोपीला केवळ कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित न ठेवता व्यसनमुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. न्यायालयाच्या परवानगीनंतर संबंधित आरोपीला मानेवाडा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लकडगंज पोलीस ठाण्यात अप.क्र. ८२१/२०२६, कलम २७ NDPS ॲक्टनुसार दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान फैजान अनवर शेख (वय २६, रा. गंगा-जमुना वस्ती, नागपूर) याला गांजा सेवनाचे व्यसन असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेऊन नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून आरोपीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
यासाठी आरोपी आणि त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून सविस्तर समुपदेशन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत कुटुंबीयांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पोलिसांच्या समुपदेशनानंतर आरोपीने स्वतःहून व्यसनमुक्ती उपचार घेण्याची तयारी दर्शवली आणि लेखी संमती दिली. त्यानंतर NDPS कायद्याच्या कलम ६४-अ अन्वये आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व्यसनमुक्ती व पुनर्वसनासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाची परवानगी आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर आरोपीला नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र, मानेवाडा, नागपूर येथे वैद्यकीय उपचार व नियमित समुपदेशनासाठी दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त उत्तर विभाग, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ३ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस हवालदार मयूर बनसोड, आनंद मरसकुल्हे आणि पोलीस शिपाई देवानंद सेलोकार यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याबरोबरच व्यसनाधीन तरुणांना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून नवजीवन देण्याचा प्रयत्नही पोलिसांच्या सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. लकडगंज पोलिसांच्या या उपक्रमातून कायद्याची अंमलबजावणी आणि मानवी दृष्टिकोन यांचा समन्वय दिसून येत असून, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी कुटुंब, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन दो गांवों में किसानों के साथ मनाएंगे दिवाली

नागपुर. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस बार दिवाली का त्योहार किसानों के साथ मनाने जा रहे हैं। राज्य के मंत्रियों और जनप्रतिनिधियों से सूखे की मार झेल रहे किसानों…

नागपुर के शिक्षक की दर्दनाक मौत!

नागपुर. मध्य प्रदेश के प्रसिद्ध पर्यटन स्थल पचमढ़ी में घूमने गए नागपुर के एक शिक्षक की दर्दनाक हादसे में मौत हो गई। बंदर द्वारा छीने गए बैग को वापस लेने…