दापोडीत रोषणाईतून अजितदादा व श्रीकांत भाऊंना अभिवादन!

दापोडी. येथील अष्टविनायक चौकात स्वर्गीय पै. श्रीकांत भाऊ काटे युवा मंच आणि श्री दादा काटे मित्र परिवार यांच्या वतीने अजितदादा आणि श्रीकांत भाऊ यांच्या छायाचित्रांची आकर्षक सजावट करून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने उजळलेला परिसर, पणत्यांची सुंदर मांडणी आणि आकर्षक रांगोळी यामुळे अष्टविनायक चौकात लक्षवेधी देखावा साकारण्यात आला. या कलात्मक सजावटीतून दोन्ही मान्यवरांप्रती आदर, प्रेम आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुबक रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
स्वर्गीय पै. श्रीकांत भाऊ काटे युवा मंच आणि श्री दादा काटे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे अष्टविनायक चौकातील वातावरण विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. आयोजकांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर. राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी…

नांदेडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!

नांदेड. शहरात पिण्याच्या पाण्याचा वाढता अपव्यय लक्षात घेता भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी आहे म्हणून त्याची किंमत नाही, ही मानसिकता बदलण्याची…