नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी आनंददायी ठरला.
रविवारी दिवाळीनिमित्त उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सायाळ गावातील मुक्ताबाई केशव धुमाळ यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी धुमाळ कुटुंबीयांसोबत पारंपरिक दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. शेतकरी बांधवांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली.
सणासुदीच्या काळात शेतकरी कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा हा प्रसंग विशेष ठरला. मंत्री सामंत यांच्या भेटीमुळे सायाळ ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी आमदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, विनय गिरडे, उमेश मुंडे, शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अपर्णा नेरळकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, तालुकाप्रमुख गणेशराव बोकारे, बाळासाहेब भोसले, प्रदीप जनक वाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरहरी वाघ, बाबुराव वाघ, बाळासाहेब पावडे, नगरसेवक सुहास कल्याणकर व योगेश मुंडे, बालाजी पोपळे, घनश्याम सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सायाळ गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेव धुमाळ, विश्वनाथ धुमाळ, किशनराव जामगे, गोविंदराव जामगे, चंद्रभान जामगे, पिराजी धुमाळ, पोलीस पाटील शिवाजी घंटलवाड, शाखाप्रमुख संजय धुमाळ, गजानन धुमाळ, सरपंच जगजीवन गायकवाड आणि उपसरपंच चंद्रभान जामगे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, नांदेड उत्तरचे तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून ग्रामीण भागाशी आपुलकीचे नाते जपण्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा उपक्रम सायाळ गावात चर्चेचा विषय ठरला.


