डॉ. भास्कर गिरिधारी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी

श्रद्धांजली सभेत मान्यवरांकडून आठवणींना उजाळा!

नाशिक. हंप्राठा महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या कार्याचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत जनजाती कल्याण समितीच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना, डॉ. गिरिधारी यांच्या व्यक्तिमत्त्वात गुणवत्ता, व्यापकता, पद-प्रतिष्ठा आणि विलक्षण खोली यांचा सुंदर संगम होता, असे गौरवोद्गार काढले. जव्हारसारख्या दुर्गम आदिवासी भागात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षणाचा पाया मजबूत केला आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. मधुकर आचार्य यांनी डॉ. गिरिधारी यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते जोडले गेलेल्या संस्थांचा विकास झाल्याचे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. गिरिधारी यांचे आदिवासी समाजाप्रती असलेले प्रेम, विद्यार्थ्यांवरील आपुलकी, संस्कृत व मराठी भाषेचा व्यासंग आणि वाङ्मय चळवळीतील योगदान यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. कुटुंबीयांच्या वतीने सुपुत्र विवेक गिरिधारी यांनी त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आठवणी सांगितल्या.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेची सांगता शांतीमंत्राने झाली. डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुलांनो, यंदाची दिवाळी करा ‘मोबाईलमुक्त’!: अतुल प्रकाश बोऱ्हाडे

अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख) दिवाळीची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंद, उत्साह आणि धमाल करण्याची पर्वणी. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात मुलांचा बहुतांश वेळ मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेममध्ये जात आहे.…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी

नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा…