दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दिवाळी

कळस पिंपरीत साधला शेतकऱ्यांशी संवाद!

अहिल्यानगर. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. पिकांची चिंता, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ७ नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील कळस पिंपरी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी भिवसेन शंकर भवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भवार कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने मंत्री विखे पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भवार कुटुंबीयांसोबत जमिनीवर बसून पिठलं-भाकरीच्या साध्या जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मंत्री विखे पाटील यांनी गावातील महिला, युवक आणि ग्रामस्थांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. लहान मुलांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप केले. भवार कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाबरोबरच शेती व्यवसायाची माहितीही त्यांनी घेतली. कुटुंबातील महिलांना कपडे आणि मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. स्वतः पणती प्रज्वलित करून त्यांनी कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना धीर देण्यासाठी आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देण्यासाठी आपण येथे आलो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत बँक खात्यात जमा केली आहे. यापूर्वी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या वीजबिलांबाबतही दिलासा देण्यात आला आहे. सरकारमधील सर्व मंत्री या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
कळस पिंपरी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थांसमोरच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. गावातील पाणीपुरवठा योजनेवर फिल्टर प्लांट बसविण्याबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.
तसेच चारा उत्पादनाबाबत प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत पालकमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून ग्रामस्थांना दिलेला विश्वास आणि आपुलकीचा आधार गावकऱ्यांसाठी विशेष ठरला.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

डॉ. भास्कर गिरिधारी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी

नाशिक. हंप्राठा महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य डॉ. भास्कर गिरिधारी यांच्या कार्याचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत जनजाती कल्याण समितीच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी

नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा…