मनाठा पोलिसांची मोठी कारवाई!

कत्तलीसाठी जाणारा ७९ गोवंशीय जनावरांचा कंटेनर पकडला; ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हदगाव (नांदेड). गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर मनाठा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हदगाव ते वारंगा रोडवरील मनाठा पाटीजवळ पोलिसांनी सापळा रचून अशोक लेलँड कंटेनर पकडला. या कंटेनरमध्ये तब्बल ७९ बैल अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. ही जनावरे मध्य प्रदेशातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मनाठा पोलिसांनी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये ७९ गोवंशीय जनावरे आढळली. पोलिसांनी ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि १८ लाख १२ हजार रुपये किमतीची ७९ जनावरे असा एकूण ४८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर तालुक्यातील मोहम्मद बिलाल अजित आणि कौशांबी जिल्ह्यातील गोबिंद अहमद मोहम्मद इसरार (वय ३४) या दोन आरोपींविरुद्ध मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले, जमादार रेणुप्रसाद भोपाळकर, शंकर सोनटक्के, रामराव राठोड, अतुल नागरगोजे तसेच मनाठा पोलीस पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास मनाठा पोलीस करीत आहेत. मनाठा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

उद्योगमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी

नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा…

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार: आमदार पाटील

नांदेड. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी…