ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

‘खुशनुमा जीवन जीने की कला’ विषयावर करणार मार्गदर्शन; कार्यक्रम विनामूल्य

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच नांदेडमध्ये येत आहेत. ‘खुशनुमा जीवन जीने की कला’ अर्थात आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याची कला या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. नांदेडकरांसाठी ही एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. कैलासनगर येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका शिवकन्या बहेनजी यांच्या अथक प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, आर्थिक विवंचना आणि सामाजिक अस्थिरतेचा सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः विस्थापित ज्येष्ठ नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रतिकूल परिस्थितीत मानसिक स्थैर्य टिकवणे, तणावावर मात करणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे मार्गदर्शन नागरिकांना मानसिक बळ आणि जगण्याची नवी उमेद देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा कार्यक्रम १७ नोव्हेंबर २०२६ रोजी, मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता नवामोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

अवैध सावकारांवर तात्काळ कारवाई करा : आ. हेमंत पाटील यांचे निर्देश

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : खासगी सावकारांनी वसुलीसाठी खासगी गुंडांच्या टोळ्या तैनात केल्या असून, फायनान्स कंपन्यांचे चालक ग्रामीण भागात दरमहा १० ते २० टक्के व्याजदराने पैसे वाटत आहेत. रिक्षाचालक, ट्रक-टेम्पो चालक…