खासगी फायनान्स कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

अनेक प्रश्न अनुत्तरित, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष!

नांदेड. तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे (वय ४०) यांचा मृतदेह नांदेड येथील के. एफ. एंटरप्राइजेस या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांनी संबंधित खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी कंपनीचे कर्मचारी गुरुवारी त्यांना माळकौठा येथून नांदेड येथील कार्यालयात घेऊन गेले होते. मात्र, शनिवारी त्यांचा मृतदेह त्याच कार्यालयात आढळून आला. या घटनेमुळे माळकौठा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जवसुलीसाठी कार्यालयात नेल्यानंतर चंद्रकांत शिंदे यांना परत घरी सोडण्यात आले होते का? ते दोन दिवस कार्यालयातच होते का? त्यांच्यासोबत नेमके काय घडले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, उपस्थितीची नोंद, संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवाल या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी ठरणार आहेत.
या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी पोलिसांचा सखोल तपास महत्त्वाचा आहे. दरम्यान, मृत चंद्रकांत शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…