ग्रामीण भागातील रस्ते व आरक्षण विकासासाठी टीडीआर लागू करा!

माजी महापौर जयश्री पावडे यांची मागणी

नांदेड. महाराष्ट्रातील ग्रामीण व प्रादेशिक योजना क्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत हस्तांतरणीय विकास हक्क प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी माजी महापौर जयश्री पावडे व ॲड. निलेश पावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना निवेदन सादर केले आहे.
ग्रामीण भागात रस्ते, दवाखाने, मैदाने आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी प्रादेशिक योजनेत आरक्षित असलेल्या जमिनींचा विकास भूसंपादनासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षे रखडतो. त्यामुळे ग्रामीण भागातही टीडीआर प्रक्रिया लागू केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आर्थिक भार कमी होईल. तसेच जमीनमालकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात विकास हक्क प्रमाणपत्र मिळू शकेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांप्रमाणेच ग्रामीण आणि प्रादेशिक योजना क्षेत्रातही टीडीआरसाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ अंतर्गत जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रादेशिक योजना कार्यालयाला विकास प्राधिकरण अथवा नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
तसेच, प्रादेशिक योजना क्षेत्रातील आरक्षित जमिनी आणि प्रस्तावित रस्त्यांच्या मोबदल्यात टीडीआर निर्माण करण्याचे व त्याच्या वापरास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाला द्यावेत, अशी मागणी जयश्री पावडे व ॲड. निलेश पावडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…