देगलूरमध्ये FDA ची धडक कारवाई; १३ लाखांचे सोयाबीन तेल जप्त

नांदेड. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत भेसळयुक्त, निकृष्ट आणि नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत राज्यभरातून सुमारे ३५.५४७ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १७९.९७ लाख रुपये आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील देगलूरजवळील खानापूर एमआयडीसी परिसरातील उमेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. भेसळीचा संशय असल्याने येथून १,५२८ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या तेलाची अंदाजे किंमत १३ लाख ५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध प्रशासनाने दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, या मोहिमेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…