पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; १,०५१ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था

पदवीधर मतदारसंघासाठी ७४१, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रे; ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४७ उमेदवार, तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दोन्ही मतदारसंघांसाठी मिळून १ हजार ५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ७४१, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांची नोंदणी झाली असून, या मतदारांसाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…