रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू; मदनापूर शिवारातील घटना

किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रातील घटना; वन विभागाकडून पंचनामा, वाघिणीचे वय ३ ते ४ वर्षे

नांदेड  (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रातील मदनापूर शिवारात रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला वाघिणीची हत्या झाली की रेल्वेच्या धडकेत तिचा मृत्यू झाला, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, मृत वाघिणीचे सर्व अवयव सुरक्षित असल्याने हा अपघात असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

शनिवारी सकाळी बोधडी वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ बोधडी, नियतक्षेत्र दर सांगवी अंतर्गत किनवट ते नांदेड रेल्वेमार्गावरील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एस. टी. इटलोड (रोहयो व वन्यजीव), सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने आणि एनटीसीएचे प्रतिनिधी अतिंद्र कट्टी यांनी घटनास्थळी भेट दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीची पाहणी करून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी वाघिणीच्या व्हिसेराचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत मृत वाघिणीचे सावरी आगार येथे दहन करण्यात आले. मृत वाघिणीचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असल्याची माहिती वन विभागाने दिली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…