अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध नागपूर पोलिसांची कठोर कारवाई

PIT-NDPS कायद्यांतर्गत सुमित मेश्रामला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश

नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी): नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्या सुमित उर्फ ‘नमो’ बंडू मेश्राम (वय ३२) याच्याविरुद्ध मादक औषधद्रव्ये आणि मनःप्रभावी पदार्थांच्या अवैध व्यापारास प्रतिबंध करणाऱ्या (PIT-NDPS) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हे आदेश दिले असून, त्यानुसार आरोपीला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सुमित मेश्राम हा नागपूर शहरातील गंगाबाई घाट परिसरातील शिवपर कॉलनी, प्लॉट क्रमांक ७३ येथील रहिवासी आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने PIT-NDPS कायद्याच्या कलम ३(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (परिमंडळ क्रमांक ३), पोलीस उपायुक्त (गुन्हे), तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पैदलवार आणि त्यांच्या पथकासह लकडगंज पोलीस ठाण्यातील एम.ओ.बी. पथकाच्या पोलीस शिपाई मंजुषा मेश्राम व भावना घोडके यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

अमली पदार्थ विक्रेत्यांना पोलिसांचा इशारा

नागपूर शहरात गांजा, चरस, एमडी ड्रग्ज आणि इतर मादक पदार्थांची अवैध खरेदी-विक्री, साठवणूक, वाहतूक, पुरवठा आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नागपूर शहर पोलिसांनी दिला आहे. नियमित गुन्हे दाखल करण्याबरोबरच, कायद्यातील आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास PIT-NDPS कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाईही केली जाणार आहे.

अमली पदार्थांचे सेवन व्यक्तीच्या आरोग्यासह कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे नागरिकांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांपासून दूर राहावे. परिसरात अमली पदार्थांची अवैध विक्री किंवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करून अमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि निरोगी नागपूर शहर घडविण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे नागपूर शहर पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…