मनःशांतीचा नवा मंत्र! विद्यार्थ्यांसाठी साउंड हीलिंग आणि मेडिटेशन सत्राचे आयोजन

Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांचा संयुक्त उपक्रम

नागपूर, पियू लाहोरी प्रतिधीनी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक स्वास्थ्य, भावनिक संतुलन आणि आंतरिक विकास साधण्याच्या उद्देशाने शांती विद्या भवन, दिगडोह येथे Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष साउंड हीलिंग आणि मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शांतता, सकारात्मकता आणि आत्मजाणीव यांचे महत्त्व अनुभवण्याची संधी मिळाली.

या सत्राचे मार्गदर्शन Ma Iraa Healings च्या संस्थापक पियू लाहोरी यांनी केले. त्यांच्यासोबत अपुर्वा खोडे आणि सारंग खोडे उपस्थित होते. ध्वनीलहरी आणि मार्गदर्शित ध्यानाच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सजगता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, हा या सत्राचा उद्देश होता. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण, अपेक्षांचे ओझे आणि भावनिक बदलांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ध्यान साधना आणि ध्वनी उपचार हे मन शांत करण्यासाठी आणि भावनिक स्वास्थ्याची जाणीव विकसित करण्यासाठी पूरक माध्यम ठरू शकतात. या सत्रातून शालेय जीवनात मानसिक शांतता आणि आंतरिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांनी या सत्रात सहभाग घेतला. प्राचार्या रघुवंशी मॅडम, तिवसे सर आणि इतर शिक्षकवृंद यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य केले. या वेळी पियू लाहोरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक प्रगतीसोबतच मानसिक शांतता, भावनिक समतोल आणि आत्मविश्वास यांनाही महत्त्व असल्याचे सांगितले. ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या विचारांकडे सजगपणे पाहणे, शांततेचा अनुभव घेणे आणि सकारात्मकतेला जीवनात स्थान देणे, यावर त्यांनी भर दिला. Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या या संयुक्त उपक्रमातून शाळांमध्ये मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…