नांदेड : लोहा शहर तीन महामार्गांवरील वाढते शहर असून, ३६१ एफ हा लोहा-गंगाखेड-बीड-खरवंडी हा २२० किमीचा हायवे लोहा शहरातून सुरू होतो. तो राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला मिळतो, म्हणून त्यास सुपर रोड म्हटले जाते. शिवाय नॅशनल हायवे ३६१, ३६१ एफ व लोहा-कंधार-उदगीर-बिदर-विजापूर-चित्रदुर्ग हा ७५१ किमी अंतराचा राष्ट्रीय महामार्ग ५० याच शहरातून जातो, तर मतदारसंघातून आणखी एक १६१ ए जातो. त्यामुळे चार महामार्गांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या या भागाची कनेक्टिव्हिटी वेगाने होण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या १२ वर्षांच्या आमदार व खासदार कार्यकाळात हे मार्ग मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या भागाचा कायापालट होताना दिसतो आहे.
लोहा शहरातून नॅशनल हायवे (NH) ३६१ हा तुळजापूर-लातूर-अहमदपूर-नांदेड-लोहा-हदगाव-यवतमाळ-नागपूर ५४८ किमीचा रोड झाला आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत झाली. लोह्याहून नांदेडला फक्त २५-३० मिनिटांत, तर पंढरपूरला पाच तासांच्या आत जाता येते. प्रशस्त रोडमुळे वेळेची बचत झाली. २०१४ मध्ये आमदार असताना लोहा शहरात २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एनएच ३६१ तुळजापूर-बुटीबोरी-नागपूर मार्गाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर…
राष्ट्रीय महामार्ग ५० हा नांदेड-उस्माननगर-शिराढोण-(लोहा)-कंधार-उदगीर-बिदर-कलबुर्गी-विजापूर-चित्रदुर्गपर्यंत ७५१ किमीचा राष्ट्रीय महामार्ग झाला. त्यामुळे उस्माननगरसह अनेक दुर्लक्षित गावांना या महामार्गाचा फायदा झाला. उदगीर-बिदरकडे जाणारी वाहतूक वाढली. आ. प्रतापराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे कंधारमधील ५० व १६१ (ए) मुळे कनेक्टिव्हिटी वेगाने वाढली. त्या मार्गाचा मावेजा मिळावा म्हणून पाठपुरावा केला. नांदेड ते बिदर हा १६१ ए राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. नांदेड-उस्मानपूर-उस्माननगर-हळदा-कौठा-मुखेड-बऱ्हाळी-औराद-बिदरपर्यंत हा मार्ग असून, त्याची लांबी ५३३ किमी आहे. म्हणून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार असताना नांदेड-बिदर व नांदेड-लातूर रेल्वे तसेच पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा ही कामे मार्गी लावली. तसेच चारही राष्ट्रीय महामार्ग बारा वर्षांच्या काळात मतदारसंघातून पूर्णत्वास गेले. त्यांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
लोहा शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग व जंक्शन
लोहा शहरातून ३६१ हा तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेला, तर शहराच्या मुख्य चौकातून एनएच ३६१ एफ हा लोहा शहरातून सुरू होतो. लोहा-पालम-गंगाखेड-परळी-बीड-खरवंडीपर्यंत २२० किमी रस्ता असून, या दोन्ही नॅशनल हायवेचे लोहा हे मुख्य जंक्शन आहे. कंधार शहरातून एनएच ५० गेला आहे. कलंबर या गावातून हा रस्ता कंधारकडे गेला. त्या महामार्गाला लोह्यातून रस्ता जोडला आहे. म्हणजे तीन राष्ट्रीय महामार्गांवरील लोहा हे शहर वाढते असून, झपाट्याने विकसित होत आहे.
आ. चिखलीकर यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्या त्या काळात सहकार्य लाभले, तर स्व. अजितदादा पवार यांचीही खूप मदत झाली. स्वतः आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दूरदृष्टी ठेवून या राष्ट्रीय महामार्गांसाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केले. त्यामुळेच हा भाग राज्याच्या नकाशावर ठळकपणे आला आहे. शेतकऱ्यांना मावेजा भेटला, तसेच व्यवसायवृद्धी झाली, जमिनीचे भाव वाढले. आ. चिखलीकर यांचे हे काम या दोन्ही तालुक्यांसाठी दूरगामी उपयोगी पडणारे आहे. अशा द्रष्ट्या नेत्याची दूरगामी विकासासाठी गरज असते. चार राष्ट्रीय महामार्ग मतदारसंघासाठी फायदेशीर ठरणार आहेत.


