मातीशी नाळ जोडलेला रांगडा माणूस हरपला; नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आशिष औंढेकर( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : मातीशी नाळ जोडलेला हा हाडाचा रांगडा माणूस आज आपल्यामध्ये नाही, ही गोष्ट खरंच अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही मोजक्या चांगल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये नानांचं व्यक्तिमत्त्व निश्चितच अग्रस्थानी होतं. तीन वर्षांपूर्वी मल्हार पाटेकर सर तसेच आमचे मित्र गणेश थोरात सर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे, नानांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी सरहद परिवारातर्फे त्यांचा सन्मान करून काही पुस्तके भेट देण्यात आली.

त्या भेटीत नानांनी सरहद संस्थेच्या कार्याबद्दल अतिशय आपुलकीने संवाद साधला. “सरहदचं काम मी अनेक वर्षांपासून जवळून पाहत आहे. सरहद संस्थेतर्फे तुम्ही करत असलेलं कार्य अतिशय विधायक आणि चांगलं आहे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही त्यांना सरहद संस्थेला सदिच्छा भेट देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी, “मला वेळ मिळाला तर मी नक्कीच संस्थेला भेट देईन,” असे सांगितले. तसेच काश्मिरी विद्यार्थ्यांना भेटायला मला आवडेल, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. इतका मोठा कलाकार, एवढं मोठं व्यक्तिमत्त्व… पण संवाद साधताना मात्र अगदी आपल्याच परिवारातील एक व्यक्ती असल्यासारखी त्यांची आपुलकी जाणवली. त्या भेटीत नाना मनाला खूप भावले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच उंची अनुभवायला मिळाली. माणूस किती जगतो यापेक्षा तो कसा जगतो, याला अधिक महत्त्व असते.

एक कलाकार म्हणून नाना कायमच अव्वल स्थानी राहिले. मात्र त्याहीपलीकडे समाजाची जाण असलेलं संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक कार्य असो, शेती असो, गाय-बैलांवरील प्रेम असो किंवा आपल्या मातीशी असलेली नाळ—नानांनी या सगळ्या गोष्टी मनापासून जपल्या. इतकं मोठं यश, प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळूनही जमिनीवर कसं राहायचं, आपल्या मातीशी नातं कसं जपायचं आणि माणूस म्हणून कसं जगायचं, हे नानांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे. खरंच, नाना म्हणजे एक परिपूर्ण माणूस म्हणून पाहावं असं व्यक्तिमत्त्व.

सरहद परिवारातर्फे नाना पाटेकर यांना मनःपूर्वक आदरांजली.

भगवंत त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…