कामगारांच्या रोजगारासाठी नीलजईच्या जीआरएन कंपनीसमोर बेमुदत आंदोलन

रोशन हरबडे यांची माहिती

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : जीआरएन कंपनी, नीलजई ओपन कास्ट येथे कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्याय आणि कामगार कायद्यांच्या उल्लंघनाविरोधात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार राजेंद्र ढवस बेमुदत आंदोलन करणार आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रोशन हरबडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे रोशन हरबडे यांनी स्पष्ट केले.

जीआरएन कंपनीने मनमानी करीत कंपनी परिसरात वास्तव्य करा, अन्यथा काम सोडा, असा इशारा राजेंद्र ढवस यांना दिला असून १४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विनाकारण त्यांना कामापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्यावर ही कारवाई कोणत्या नियमाच्या आधारे आणि कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, याचे स्पष्टीकरण कंपनीने द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नीलजई ओपन कास्ट परिसरात स्थानिक कामगार रोजगारासाठी उपलब्ध आणि इच्छुक असतानाही त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. सद्यस्थितीत येथे केवळ १०० स्थानिक कामगार कार्यरत असून ६०० हून अधिक कामगार क्षेत्राबाहेरील आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य का दिले जात नाही, याचे लेखी उत्तर वेकोलिने द्यावे, अशी मागणी हरबडे यांनी केली आहे. जीआरएन कंपनीत कामगारांचे तीव्र शोषण होत असून कामगारांकडून १२-१२ तास काम करून घेतले जात आहे. या बदल्यात केवळ १८ हजार रुपये मासिक वेतन दिले जात असून ओव्हरटाईम आणि निवासाबाबत नियमबाह्य अटी लादल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला.

राजेंद्र ढवस यांना कामावरून दूर ठेवण्याच्या आदेशाची चौकशी करून त्यांना त्वरित न्याय देण्यात यावा, स्थानिक कामगार उपलब्ध असताना त्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे कारण स्पष्ट करावे तसेच स्थानिक रोजगारासंदर्भातील सर्व लागू नियम व कंत्राटी अटींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पत्रपरिषदेला अमोल मांढरे, रवींद्र ताजने, राजेंद्र ढवस आणि गितेश चौरे उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…