ज्ञानोबारायांनी दिलेले ज्ञानरूपी अमृत ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पैठण

ज्ञानोबारायांनी दिलेले ज्ञानरूपी अमृत काळाच्या ओघात अशुद्ध होऊ नये, म्हणून माऊलींच्या आज्ञेने शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले. आळंदी येथे ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध घेऊन तिचा जीर्णोद्धारही त्यांनी केला.

भाद्रपद वद्य षष्ठीला प्रतिष्ठान क्षेत्री गोदावरीच्या तीरावर शुद्ध ज्ञानेश्वरीचे पुनःप्रकाशन करून ती समाजाला अर्पण केली. याद्वारे ते मराठी भाषेतील आद्य संपादक, प्रकाशक व वितरक ठरतात. आज आपण श्रद्धेने ज्या ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, ती शुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचविण्यामागे एकनाथ महाराजांची ही महान सेवा आहे. ही केवळ ग्रंथशुद्धी नव्हे; ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन आणि वारकरी संप्रदायासह मराठी भाषिकांवरची अमूल्य कृपा आहे. आजही ज्ञानेश्वरीच्या शेवटी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या या चार ओव्या आपल्याला प्रत्येक शुद्ध ग्रंथात वाचायला मिळतात—

श्रीशके पंधराशें साहोत्तरीं । तारणनामसंवत्सरीं ।
एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥१॥

ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध ।
तो शोधूनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥२॥

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचितां टीका ।
ज्ञान होय लोकां । अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥३॥

बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी ।
प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठीं संपूर्ण जाली ॥४॥

ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी पैठणकर
(शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज, श्रीनाथ संस्थान, श्रीक्षेत्र पैठण)

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…