नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड शहरातील खडकपुरा, भोई गल्ली येथे राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्या माणिक पंदीलवाड यांच्या कु. आकांक्षा माणिक पंदीलवाड हिने बीएएमएस वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून आपल्या वडिलांच्या घरी वैद्यकीय ज्ञानाचा दिवा लावला आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था, नांदेड शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डी. के. तोकलवाड, उपाध्यक्ष व्यंकटराव नागलवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. पी. वन्नलवाड आदी पदाधिकाऱ्यांनी आकांक्षा तसेच तिच्या आई-वडील व आजी-आजोबांचा सत्कार केला. यावेळी आकांक्षाला भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कोणतीही शिकवणी न लावता केवळ घरी अभ्यास करून आकांक्षाने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल भोई समाजासह विविध स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.
आयोजित कार्यक्रमास सतीश बट्टेवाड, एन. एस. संभाजीराव डुबुकवाड, दिलीपराव पंदलवाड, गजानन टोकलवाड, घंटलवाड के. के., गलपवाड पी. एम., बालाजीराव डुबुकवाड, व्यंकटराव निलेवाड, तुकाराम निलेवाड, व्यंकटराव जेलेवाड, सचिन निलेवाड, हरीश बटनवाड, रामजी बोरीकर, पिंटू बोरीकर, माणिकराव बोरीकर, धावरीकर मामा, संभाजी पंदलवाड, बालाजीराव वाखरडकर, गोपीनाथ डुबुकवाड यांच्यासह भोई समाजातील बहुसंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


