नांदेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

तांत्रिक तपास आणि CEIR प्रणालीच्या मदतीने ३०५ गहाळ मोबाईल शोधले; ४१ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल नागरिकांना परत

नांदेड, रविंद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड जिल्ह्यात गहाळ तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सायबर पोलीस व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी तांत्रिक तपास तसेच केंद्र शासनाच्या CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करत तब्बल ३०५ मोबाईल फोन हस्तगत केले. या मोबाईलची अंदाजे किंमत ४१ लाख ३१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच विविध भागांतून नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मोबाईलचे IMEI क्रमांक, पोलीस अभिलेख आणि CEIR प्रणालीतील उपलब्ध माहितीची पडताळणी करून शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक तपासातून शोधण्यात आलेले ३०५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांशी जोडण्यात आले. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल परत सुपूर्द करण्यात आले. मोबाईल हरवल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक व मानसिक अडचणी दूर झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, सपोनि करहाळे व राठोड, तसेच महिला अंमलदार शुभांगी जाधव, कांचन कसबे, सुजाता अंळदीकर आणि पोलीस अंमलदार दीपक ओढणे, विलास राठोड, मोहम्मद आसिफ, अविनाश ठोके, दाविद पिडगे, काशीनाथ कारखेडे, ज्ञानेश्वर यन्नावार, दीपक राठोड व योगेश कारामुंगे यांनी पार पाडली.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…