अमृत संस्थेच्या पुढाकारातून टाकळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत दंतचिकित्सा

‘सेवा संकल्प अभियान’निमित्त ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’निमित्त ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेत मोफत दंतचिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉ. श्री. सागर नाईक (डेंटिस्ट) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. तसेच दातांची निगा व काळजी कशी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरासाठी शाळेचे प्रिन्सिपल श्री. संजय खरात सर व श्री. विलास वालझाडे (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अमृतमित्र श्री. संदिप देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. अमृत संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पेन्सिलचे वाटपही करण्यात आले. ‘एक दिवस राष्ट्रासाठी… एक पाऊल समाजासाठी..!’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अमृत संस्था ‘अमृत सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभर सामाजिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर उपक्रम राबविणार असल्याचे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी सांगितले.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविते. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…