अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातून व महाराष्ट्र शासनाच्या कौशल विभागाचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात एकाच दिवशी ५०० ठिकाणी रोजगार महाकुंभ प्लेसमेंट ड्राईव्ह हा उपक्रम राबविण्यात आला. या महाकुंभाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी कौशल विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हयातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश ठेवून हा उपक्रम जिल्हा, तालूका व औद्योगिक परिसरांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यात झालेल्या रोजगार मेळाव्याचा तपशील खालील प्रमाणे-
एकूण झालेले मेळावे – २५
एकूण सहभागी उद्योजक कंपनी – २७२
एकूण रिक्तपदे / (व्हेकन्सी) – ५२५९
एकूण उपस्थित उमेदवार – ८२९८
प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या – २६०८
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची संख्या – १०१४
नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या – ९३
प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना व अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना पुढील राऊंडसाठी कंपनी ऑफिस बोलावणार आहे.
‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. पंकज आशिया, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त योगेश उगले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नलावडे, जिल्हा रोजगार मेळावा समितीचे समन्वयक श्री अमोल घोलप, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार समितीचे सदस्य विनायकराव देशमुख, सर्व महाविद्यालयांचे मा. प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतनचे मा. प्राचार्य, सर्व आयटीआयचे मा. प्राचार्य, सर्व आयटीआयचे अधिकारी कर्मचारी, सर्व संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, विविध एनजीओचे अधिकारी-कर्मचारी, अनुलोम संस्थेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा रोजगार समितीचे सर्व सदस्य, MCCAI, AAMI चे सर्व पदाधिकारी, विविध उद्योग संघटना व विविध कंपनीचे प्रतिनिधी यांचे प्रयत्नातून व सहकार्याने जिल्ह्यात रोजगार महाकुंभ यशस्वी झाला.


