बहादुरा नगरपंचायतीच्या अवाजवी पाणी बिलाविरोधात विराआंस आक्रमक

बहादुरा येथे ‘मटका फोड’ आंदोलन ; अवाजवी बिले दुरुस्त करण्यासह रास्त दरांची मागणी

बहादुरा ,प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : बहादुरा नगरपंचायत भागातील अनियमित पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि अवाजवी पाणी बिलांच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) वतीने ‘मटका फोड’ आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मेघाताई मातुरकर, अश्विनी मुंजे आणि बबिता नखाते यांच्या नेतृत्वाखाली बहादुरा नगरपंचायत ते सरस्वती नगर पाणी टाकीपर्यंत पायदळ मार्च काढण्यात आला.

आंदोलनादरम्यान महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्ता तारेश दुरुगकर थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मेट्रो शहर असलेल्या नागपुरात घरगुती ग्राहकांसाठी पाण्याचा किमान दर १०० रुपये असून, २० युनिटपर्यंत ९ रुपये आणि २१ ते ३० युनिटपर्यंत १४.३७ रुपये प्रति युनिट दर आकारला जातो. त्याउलट बहादुरा नगरपंचायत क्षेत्र ग्रामीण भागात असूनही नागरिकांना किमान २२५.०६ रुपये दर आकारला जात असल्याचा आरोप समितीने केला. तसेच १५ हजार लिटरपर्यंत २२.९९ रुपये आणि १५ हजार ते २० हजार लिटरपर्यंत ३५.४५ रुपये दराने आकारणी केली जात असल्याचे समितीने सांगितले. वाढत्या वापरानुसार नागरिकांना मोठी बिले येत असून, अनेकांची बिले लाखांच्या घरात गेल्याने नागरिकांमध्ये संताप असल्याचे समितीने म्हटले आहे.

या संदर्भात समितीने महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणाच्या उपकार्यकारी अभियंता पाठराबे मॅडम यांना निवेदन दिले. अवाजवी पाणी बिले दुरुस्त करण्यासाठी तात्काळ विशेष शिबिरे आयोजित करावीत, नागपूर शहराच्या धर्तीवर बहादुरा भागातही पाण्याचे किमान व रास्त दर लागू करावेत, नियमित, पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा तसेच दरमहा वेळेवर मीटर रीडिंग घेऊन नियमित बिले द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनात युवा आघाडी प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष वीणा भोयर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, महिला अध्यक्षा ज्योतीताई खांडेकर यांच्यासह संगीता नरड, गिरीश तितरमारे, मंदा आष्टनकर, मांडवकर काकू, नफीसा शेख, शाईन शेख, उमेश कळंबे, राहुल बनसोड, तेजराम रेवतकर, भरत बविस्टाले, रामभाऊ सूर्यवंशी, रहमान शेख, रहीम खान, ललिता साठवणे, अरुणा तुरणकर, अब्दुल गफार, जावेद शेख, गंगाधर मुंडकर, चंद्रशेखर शेंडे, गज्जू पाल, भाग्यश्री सोनेकर, अहिरकर ताई यांच्यासह शेकडो महिला-पुरुष नागरिक उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…