मुंबई : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने वरिष्ठ पत्रकार मनेंद्र प्रताप सिंह यांची महासभेच्या राष्ट्रीय मीडिया प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ठा. भेरूसिंह चौहान यांनी सर्वसंमतीने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. संगठनात्मक दायित्वांचे प्रभावी निर्वहन तसेच समाजहितातील सक्रिय योगदान लक्षात घेऊन सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे अध्यक्ष चौहान यांनी सांगितले.
दरम्यान, महासभेने संघटनेचा विस्तार करत हरिशचंद्र सिंह जसोल यांची युवा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते दिग्गज नेते स्व. जसवंत सिंह यांचे नातू आहेत. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा क्षत्रिय समाजातील जुने आणि प्रभावशाली संघटन असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही कार्यरत आहे. राष्ट्रीय मीडिया प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मनेंद्र प्रताप सिंह यांनी महासभा परिवाराचे आभार मानले. मिळालेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असून, समाज आणि संघटना मजबूत करण्याच्या दिशेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सिंह यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. बेनिन विद्यापीठाने त्यांना ग्लोबल पीस अॅम्बेसेडर ही मानद उपाधी प्रदान केली आहे.


