आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत सरस्वती विद्यालयाचा प्रथम क्रमांक; विभागीय स्तरासाठी पात्र

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नागपूर येथील आरटीएम नागपूर विद्यापीठाच्या बास्केटबॉल मैदानावर आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय, शंकरनगरच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे संघाने विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

विजयी संघात अनघा धर्मे, अक्षदा धर्मे, सेजल मिशा, वास्तवी पाटील, आरोही खैर्या, भूमी ढोके, भावी येडेकर, रुद्राणी दरवेकर, निराली शेट्टेवार, मनुश्री शेंद्रे, सौजन्या काजणे आणि अलिशा बन्सोड यांचा समावेश होता. प्रशिक्षक डॉ. ब्रिजमोहन रावत, श्री. पुष्पक तांबेकर आणि श्री. वैभव कुभंरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

संघाच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका सौ. शैली अय्यर, पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे, श्री. शैलेंद्र ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आणि आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…