नागपूर, उज्वल रोकडे ( प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी तीर्थक्षेत्र कोटेश्वर व खडकी येथे तीर्थदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी खडकी येथे हनुमानाचे, तर कोटेश्वर येथे श्री कोटेश्वराचे दर्शन घेतले.
ही सहल प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आली. सहलीत ३५ सभासदांनी सहभागी होऊन अध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घेतला. सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव वसंतराव इझनकर, उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, शोभा आगरकर, निंबाळकर व रासेकर यांनी परिश्रम घेतले. सहलीत गोजे, बावनकर, अरमरकर, वाकोडीकर, सिंगरू, मस्के, बागडे, खोडे, शिंदे, मुंगळे, धनजोडे, जयस्वाल, चौधरी यांच्यासह इतर सभासद सहभागी झाले. धार्मिक स्थळांच्या दर्शनासोबतच या सहलीमुळे ज्येष्ठ नागरिकांमधील आपसातील संवाद व स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत झाली. अशा सहली वारंवार आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त करण्यात आली.


