अक्सा आणि मार्वे बीचवर स्वच्छता अभियान; २ ट्रॉलींपेक्षा अधिक कचरा संकलित

मुंबई : आंतरराष्ट्रीय सागरी तट स्वच्छता सप्ताहाचे औचित्य साधून चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ सप्टेंबर) अक्सा आणि मार्वे बीच येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात फाऊंडेशनचे २०० हून अधिक स्वयंसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या प्रेरणेतून आयोजित या उपक्रमात स्वयंसेवकांनी अक्सा आणि मार्वे बीचवरील प्लास्टिक, कागद तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा केल्या. या मोहिमेत दोन ट्रॉलींपेक्षा अधिक कचरा संकलित करण्यात आला. संकलित कचरा पुढील योग्य विल्हेवाटीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला.

या अभियानाला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाळा तावडे, उपाध्यक्ष शरद साटम, चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम, सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष सचिन नायक, जयश्री गाणात्रा, राज त्रिवेदी, अजित डोंगरे, शिवाजी शेट्टी, एस. श्रीनिवास, बालराज डुबक यांच्यासह सागरी सीमा मंचचे दुर्गेश बोराडे, जयंत चव्हाण, मोहित, चंदू म्हात्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. “अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर या स्वच्छता अभियानामुळे अक्सा व मार्वे बीच पुन्हा एकदा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहेत,” असे चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी सांगितले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…