परभणीच्या विकासकामांसाठी मंत्रालयात मंत्र्यांची भेट; दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

परभणी,निलेश कामतीकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री मकरंद (आबा) पाटील, भारत (सेठ) गोगावले आणि संजय (भाऊ) राठोड यांची भेट घेण्यात आली.

यावेळी परभणीसह मराठवाड्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा अवगत करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थिती १९७२च्या दुष्काळाची आठवण करून देणारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत व कर्जमाफी, पीक विम्याचा लाभ, रोजगार हमीची कामे सुरू करणे, मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच गावागावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

यासोबतच मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळावी, प्रलंबित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा आणि नागरिकांच्या प्रश्नांची शासनस्तरावर तातडीने दखल घेतली जावी, यासाठी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…