गौरी-गणपतीनिमित्त घरातील देखाव्यातून आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण रक्षणाचा संदेश

परदेशी दाम्पत्याचा उपक्रम

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  महाराष्ट्रात बहुतांश भागात घरोघरी गौरी-गणपतीची स्थापना केली जाते. भक्तिभावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पारंपरिक उत्सवात महिला वर्ग आपल्या कल्पनेप्रमाणे देखावे साकारतात. अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात राहणारे राजेश परदेशी व सौ. परदेशी यांनी त्यांच्या घरी गौरी-गणपतीनिमित्त यावर्षी “आपत्ती व्यवस्थापनातून सुरक्षितता” हा देखावा सादर केला आहे.

पर्यावरणाचे रक्षण केल्यास नैसर्गिक आपत्ती टाळल्या जाऊ शकतात, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नांचा विचार कौटुंबिक स्तरावर झाल्यास समाजातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते, अशा भावना देखावा पाहण्यासाठी आलेल्या स्नेही मंडळींनी व्यक्त केल्या. तसेच परदेशी दाम्पत्याचे कौतुक केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…