हातगाव येथे ‘पावन गणेश मित्र मंडळा’तर्फे रक्तदान शिबिर

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे ‘पावन गणेश मित्र मंडळा’तर्फे २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणपती उत्सवाच्या काळात मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम विशेष ठरला.

अहिल्यानगर येथील रा. स्व. संघ जनकल्याण रक्तपेढीच्या टीमने या शिबिरात रक्तसंकलन केले. रक्तदान शिबिराला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तपेढीचे डॉ. मनोहर देशपांडे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. पावन गणेश मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेला हा समाजोपयोगी उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…