चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटीच्या (ट्रस्ट) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात विद्युत अभियांत्रिकी तांत्रिक संघटनेच्या (ईईटीए) सहकार्याने ५९ वा अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागाच्या सेमिनार सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, चंद्रपूर स्थानिक केंद्राचे अध्यक्ष इंजिनिअर शैलेश पुरुषोत्तमदासजी बागला प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभियंत्यांची बदलती भूमिका, व्यावसायिक जबाबदारी, तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदित्य येरणे, अध्यक्ष – ईईटीए यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. साक्षी विधाते यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर रिया घुमडे व भूमिका नवघरे यांनी अभियंता दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना अभियंता शपथ देण्यात आली. प्रा. डी. बी. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत प्रामाणिकपणा, गुणवत्ता, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुयोग एस. ढोके व प्रा. दीपली आर. वैद्य यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच जोश वानखेडे, रिया कांबळे, पवानी रेड्डी, यशिका खोब्रागडे, गुणश्री गोराडवार व अर्पित कांपेल्ली यांनी आयोजन समितीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीलकुमार न्याथानी व साक्षी मेडिपल्ली यांनी केले, तर गायत्री निवळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
“अभियांत्रिकी ही केवळ तंत्रज्ञानाची निर्मिती नसून समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याची संधी आहे,” या भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबत नवोन्मेष, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


