अनुलोमच्या भाग जनसेवकांच्या हस्ते भाजपा कार्यालयात गणपती आरती

भक्तिमय वातावरणात आरती; सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी  (प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर कार्यालय येथे श्री गणपती बाप्पांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले. या आरतीसाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) मधील सर्व भाग जनसेवकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी भाजपा कार्यालयीन मंत्री मा. श्री. मुकुंल गंधे, अनुलोम जिल्हाप्रमुख दीपक रोहकले, शेवगाव विधानसभा अनुलोम प्रमुख गणेश मोरे, श्रीगोंदा विधानसभा प्रमुख राम भालसिंग, नगर विधानसभा प्रमुख अमोल अवस्थी तसेच पारनेर विधानसभा प्रमुख प्रसाद तोटे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांच्या आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…