तिवस्यातील बुद्धविहारासाठी आमदार राजेश वानखडेंकडून दोन कोटींचा निधी

पंचशील व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार; प्रभाग ८ मधील समाजबांधवांना मोठा दिलासा

तिवसा , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बौद्ध समाजाच्या जुन्या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी आमदार राजेश वानखडे यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक वर्षांपासून जर्जर अवस्थेत असलेल्या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसह सार्वजनिक सभागृह व अभ्यासिका उभारण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल पंचशील व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आमदार राजेश वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये बौद्ध समाजाची वस्ती असून, या ठिकाणी सुमारे पन्नास वर्षांपासून बुद्धविहार अस्तित्वात आहे. मात्र, इमारत जुनी झाल्याने भिंतींना भेगा पडल्या असून पावसाळ्यात छताला गळती लागण्यासह विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नवीन बुद्धविहाराची उभारणी करण्याची मागणी समाजबांधवांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीसाठी पंचशील व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रतिनिधींनी आमदार राजेश वानखडे यांची भेट घेऊन बुद्धविहाराची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदार वानखडे यांनी या मागणीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत तिवसा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये बुद्धविहाराचे बांधकाम, सार्वजनिक सभागृह तसेच अभ्यासिका उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतला.

निधी उपलब्ध झाल्याने बौद्ध समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंचशील व्यायाम प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आमदार राजेश वानखडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सुदर्शन यावले, रवि खाकसे, मिलिंद यावले, जगदीश माहोरे, श्रीधर शापामोहन, आनंद शापामोहन, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई भूषण यावले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड दिलीप शापामोहन, पत्रकार प्रशिक शापामोहन, पत्रकार अमोल खाकसे यांच्यासह सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश वानखडे यांनी संबंधित कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले. तसेच पंचशील यात्रेसाठीही आवश्यक मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…