सामाजिक विचारांचे मंथन घडवणारा ‘जयंती-२’

चंद्रपुरात कलावंतांनी साधला पत्रकारांशी संवाद

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : ‘जयंती-२’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नसून, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाचा सशक्त संदेश देणारा कलाविष्कार आहे. हा चित्रपट कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला लावणारा आहे, असा सूर चित्रपटाच्या कलावंतांनी येथे आळवला. शुक्रवारी चंद्रपुरात आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रपटामागची भूमिका स्पष्ट केली.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘जयंती-२’ हा चित्रपट चंद्रपुरातील चार चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. या निमित्ताने चंद्रपूरला विशेष भेट देणारे चित्रपटातील कलाकार शुभम, प्रसन्नजीत आणि अविनाश लेनगुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आरक्षणासारख्या संवेदनशील विषयांवर हा चित्रपट थेट प्रकाशझोत टाकतो. तरुणांमध्ये आणि समाजात सामाजिक विषयांबाबत संवेदनशीलता वाढवणे तसेच सकारात्मक संवाद निर्माण करणे हाच या भेटीमागचा मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा संबंध चंद्रपूरच्या इतिहास व भूमीशी जोडलेला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन स्थानिक कलावंतांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या जनजागृती उपक्रमासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंद्रपुरातील सहकारी अविनाश लेनगुरे, सम्राट कांबळे, अमित, केशव मेश्राम आणि इतर साथीदार सहभागी झाले आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने, विशेषत: युवापिढीने व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहावा आणि यातून मांडलेल्या विचारांवर मोकळा संवाद घडवून आणावा, असे आवाहन जयंती-२ च्या संपूर्ण टीमने याप्रसंगी केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…