अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : १७ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे. २५ वर्षात भारताला एक महासत्तेपर्यंत पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले आहे. त्यासाठी मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद म्हणून नागरिकांनी एक दिवा सायंकाळी आपल्या घरी लावावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग व जिल्हा सरचिटणीस सौ. शुभांगी सप्रे यांनी केले आहे.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात “एक दिवा आशीर्वादचा ! विकसित भारत संकल्पाचा!” दिवा घरोघरी लाऊन मोदींचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आपण घरोघरी हा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग व जिल्हा सरचिटणीस सौ. शुभांगी सप्रे यांचेसह जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर खरमारे, अमोल भनगडे, सुभाष दुधाडे, संतोष म्हस्के यांनी केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील, ना. प्रा. रामजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, यांचे तसेच विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य सर्व मा. आमदारांच्या नेतृत्वात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस जिल्ह्यात साजरा होत आहे. असे सौ. सप्रे यांनी सांगितले.


