बोंजुर्डीच्या कृष्णाची उत्तुंग झेप..!

माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक; गावासह चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण

चंदगड ( प्रतिनिधी ) : चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी गावचा होतकरू तरुण कृष्णा प्रकाश पाटील याने जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या निवड प्रक्रियेत झालेल्या परीक्षेत त्याने संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामुळे त्याची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता कमी नसते, केवळ योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाची गरज असते, हे कृष्णाने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. मर्यादित साधनांमध्येही ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांमध्ये स्थान मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्याच्या यशातून मिळत आहे.

कृष्णाच्या या यशाची माहिती मिळताच बोंजुर्डी गावासह चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नेवासा येथे उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाला सुरुवात

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत आयोजित १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या (EDP) प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना…

विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्याच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे : प्रा. शिवदास शिंदे

परभणी, निलेश कामतीकर (जिल्हा प्रतिनिधी) : हिंदी भाषा ही एकात्मता, संस्कृती आणि भावनेचे प्रतीक असून ती समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य करते. भाषा ही संस्कृतीची वाहक असल्याने प्रत्येक भाषेचा आणि…