सामाजिक कार्याची दखल; भाजपा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण

अमरावती,  राज माहोरे ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमित भाबूडकर यांची अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती, अमरावती या महत्त्वपूर्ण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठनाची प्रक्रिया सुरू असून, प्रस्तावित सदस्यांच्या यादीत अमित भाबूडकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या या समितीला विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेणे, पीडितांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा पाठपुरावा करणे, संबंधित विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असते. अमित भाबूडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. याशिवाय रुग्णसेवा, गरजू नागरिकांना मदत, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा, तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

विशेषतः रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे यामुळे त्यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या जनसेवेची दखल घेत समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमित भाबूडकर यांनी सांगितले की, “पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या न्यायहक्कांसाठी, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. ही केवळ नियुक्ती नसून समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची संधी आहे.”

या नियुक्तीबद्दल महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड, वरिष्ठ नेते रविराज देशमुख यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अमित भाबूडकर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक न्याय व्यवस्थेला अधिक बळ मिळेल आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अमित भाबूडकर यांच्या नियुक्तीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या सामाजिक अनुभवाचा आणि जनसंपर्काचा लाभ समितीच्या कामकाजाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नेवासा येथे उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाला सुरुवात

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत आयोजित १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या (EDP) प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना…

विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्याच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे : प्रा. शिवदास शिंदे

परभणी, निलेश कामतीकर (जिल्हा प्रतिनिधी) : हिंदी भाषा ही एकात्मता, संस्कृती आणि भावनेचे प्रतीक असून ती समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य करते. भाषा ही संस्कृतीची वाहक असल्याने प्रत्येक भाषेचा आणि…