अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

आ. बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम; महाप्रसादाचेही आयोजन

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच समाजबांधवांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला दिलीप सोनवाडे, उपनगराध्यक्ष नगरपालिका भोकर, नगरसेवक सौ. मिनल पाटील, नगरसेवक संदीपसिंघ गाडीवाले, माजी नगरसेवक श्याम कोकाटे, नगरसेवक सुभाष गुजर (परभणी), नगरसेवक सुभाष कासले (गंगाखेड), नगरसेवक राजू चमकुरे (मुदखेड), नगरसेवक दिलीप पवार (कंधार), निळकंठ वर्षवार, किसन रॅपनवाड, रामराव गोरे, ॲड. प्रा. साहेबराव शंकरराव बेळे, ॲड. माधव गुंजाळ, माधव देवकर, गुणाजी शेळके, बाळासाहेब देवकर, आकाश पवार, मारोती छापेवार, रमेश दिंडे, तुकाराम मोरे, लालेश बिजापूरे, नागेश देवकर आदी उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…

पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे २६-२७ सप्टेंबरला आयोजन

पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या…