३६ फुटी त्रिशूळाने वेधले भाविकांचे लक्ष

नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेडजवळील मरळक बुद्रुक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर हे मराठवाड्यातील पुरातन शिवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ‘अनंतशायी विमलेश्वर’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात यंदाच्या श्रावण मासानिमित्त ३६ फूट उंच भव्य त्रिशूळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे त्रिशूळ हे यंदाच्या श्रावणातील प्रमुख आकर्षण ठरले आहे.

अतिप्राचीन असलेल्या या मंदिराचा १३व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांचे प्रधान हेमाद्री पंडित अर्थात हेमाडपंत यांच्या काळात जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. पारंपरिक हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम, भव्य रचना आणि प्राचीन वास्तूवैभव आजही भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिर परिसरातील कासवांची बारव हेही येथील विशेष आकर्षण आहे. या प्राचीन कुंडात अनेक कासव पाहायला मिळतात. कुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग महादेवाच्या अभिषेकासाठी केला जातो. परिसरातील सुंदर दीपमाळ मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

श्रावणातील सोमवार आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे प्राचीन शिवस्थान इतिहास, स्थापत्यकला आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणते. नांदेड शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात श्रावणात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…