पुणे : दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला यांच्या पिंपळे निलख, पुणे शाखेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक, खातेदार, हितचिंतक तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
शाखेच्या स्थापनेपासूनच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालीबद्दल उपस्थित मान्यवर आणि ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. या कालावधीत शाखेने ग्राहकांचा विश्वास संपादन करत परिसरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या. सहकार क्षेत्राची समृद्ध परंपरा जपत सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि विविध घटकांना सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य हेच शाखेच्या यशाचे प्रमुख बळ असून, भविष्यातही अधिक दर्जेदार व तत्पर बँकिंग सेवा देण्यासाठी शाखा कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास ग्राहक, खातेदार, हितचिंतक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाखाधिकारी विक्रम कुकडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


